हटके

क्रांती अर्बनच्या वांगी शाखेचा आज प्रथम वर्धापन दिन

क्रांती अर्बनच्या वांगी शाखेचा आज प्रथम वर्धापन दिन
21 Sep 2026, 23:23 105 views
सत्यनारायण महापूजेचे आयोजन; आमदार अरुण लाड, संस्थापक शरद लाड यांची प्रमुख उपस्थिती

वांगी : क्रांती WAVE वृत्तसेवा

क्रांती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., पलूसच्या वांगी शाखेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम अहिल्यादेवी चौक, कारखाना रोड, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली येथील क्रांती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वांगी शाखेत होणार आहे.

कार्यक्रमास आमदार अरुण  लाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून संस्थेचे संस्थापक शरद लाड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच संस्थेचे चेअरमन धन्यकुमार पाटील, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ आणि शाखाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संचालक मंडळाची उपस्थिती

वर्धापन दिन सोहळ्यास संस्थेचे व्हा. चेअरमन प्रथमेश दिवटे, तसेच संचालक सर्वश्री सतीश चोगुले, दिलीप जाधव, सुरेश शिंदे, सुरेश देशमुख, घनश्याम पोळ, पंकज पाटील, शिवाजी केसरे, समीरखान मुल्ला, सुनिता पाटील, नंदिनी पाटील, प्रमोद माने आणि व्यवस्थापक सागर रेपाळ उपस्थित राहणार आहेत.

सल्लागार मंडळाची उपस्थिती

यावेळी सल्लागार मंडळातील हणमंत मोहिते, मोहन मोरे, सुशांत पाटील, संभाजी पाटील, सचिन महाडिक आणि रत्नदीप माने उपस्थित राहणार आहेत. तसेच शाखाधिकारी सत्यम चव्हाण यांचीही उपस्थिती राहणार आहे.

वांगी शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्यनारायण महापूजा व वर्धापन दिन सोहळ्यास सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!