हटके

अंधश्रद्धेच्या विळख्यातील शोषणावर नागराळेत विचारमंथन

अंधश्रद्धेच्या विळख्यातील शोषणावर नागराळेत विचारमंथन
29 Sep 2026, 10:53 132 views
कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा

अंधश्रद्धेच्या माध्यमातून होणारे शोषण, त्यामागील सामाजिक वास्तव आणि त्यावरील उपाययोजना यावर पलूस तालुक्यातील नागराळे येथे विचारमंथन होणार आहे. भागीरथी यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ २९ वा अंधश्रद्धा निर्मूलन संकल्प दिन रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नवीन ग्रामपंचायत सभागृह, नागराळे (ता. पलूस, जि. सांगली) येथे आयोजित करण्यात आला आहे.

नागराळे ग्रामविकास वाचनालय, व्ही. वाय. पाटील प्रबोधनी अकॅडमी, समाजवादी प्रबोधिनी शाखा किर्लोस्करवाडी-पलूस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांनी प्रेरित या उपक्रमात अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात ‘अंधश्रद्धेच्या विळख्यातील शोषण आणि उपाययोजना’ या विषयावर चर्चा होणार आहे. विद्युत अभियंता आणि अनिस राज्य कार्यकारिणीचे सदस्य फारुख गवंडी मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व पुरोगामी संघटनांचे संघटक डॉ. वासुदेव गुरव राहणार आहेत.

कार्यक्रमाला समाजवादी प्रबोधिनी, प्र. शा. कि. पलूसचे निमंत्रक आदम पठाण, शिक्षक नेते व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव कॉ. मारुती शिरतोडे, राष्ट्रसेवक दल, तासगावचे अध्यक्ष नूतन परिट, पलूस तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष हिम्मतराव मलमे आणि सांगली जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अमर खोत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दीपप्रज्वलन कविता पाटील, साधना बनकर, माधवी शिंदे, कल्पना मलमे, सुनिता कोळी आणि रंजना शिरतोडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रमाच्या निमंत्रकांमध्ये  व्ही. वाय. पाटील, डॉ. अमोल पवार, प्रा. उत्तमराव सदामते, सुनील गुरव, कॉ. अर्जुन जाधव, संदीप नाझरे, कॉ. दीपक घाडगे, दीपक पवार, देवकुमार दुपटे, प्रा. रविंद्र येवले, रघुनाथ पवार, मंगेश गायकवाड, डॉ. नरेंद्र शिंदे,  डॉ. अंकुश जाधव, प्रा. एम. डी. पाटील, किशोर मोहिते, राम चव्हाण, रमेश लाड आणि अमोल लाड यांचा समावेश आहे.

अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि त्यातून होणारे शोषण याविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिज्ञासू व अभ्यासू नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक आणि महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वेळ : रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६, सकाळी १० वाजता
स्थळ : नवीन ग्रामपंचायत सभागृह, नागराळे, ता. पलूस, जि. सांगली
प्रेषक : राहुल नामदेव, ग्रामविकास कार्यालय, नागराळे, ता. पलूस, जि. सांगली

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!