हटके

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २३ सप्टेंबरला अभिवादन कविसंमेलन

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २३ सप्टेंबरला अभिवादन कविसंमेलन
17 Sep 2026, 19:18 315 views

विट्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात साहित्यिक-कवींची उपस्थिती

कुंडल : क्रांती WAVE वृत्तसेवा

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विटा येथील नेवरी नाका परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात अभिवादन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हौसाताई पाटील यांच्यावर प्रेम करणारे तसेच त्यांच्या कार्याविषयी आस्था असणारे प्रख्यात साहित्यिक, कवी आणि विडंबनकार या कविसंमेलनात सहभागी होणार आहेत.

अहमदपूर येथील ‘माय मराठी’ वृत्तवाहिनीचे निर्माते-संपादक तथा ज्येष्ठ कवी राजेसाहेब कदम हे आपल्या साहित्यिक मित्रांसह उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रख्यात साहित्यिक व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.

याशिवाय परिसरातील साहित्यिक व कवी रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सुभाष कवडे, सुधीर इनामदार, सुनील दबडे, एम. डी. जमादार, अशोक पवार, कवयित्री वृषाली कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर कवी-साहित्यिक या अभिवादन कविसंमेलनात सहभागी होणार आहेत.

हौसाताई पाटील यांच्या स्मृतींना काव्यरूपी अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!