शेती

घानवड व शिरढोण येथे क्रांती कारखान्याच्या गट कार्यालयांचा शुभारंभ

घानवड व शिरढोण येथे क्रांती कारखान्याच्या गट कार्यालयांचा शुभारंभ
31 Aug 2026, 18:58 541 views
घानवड व शिरढोण येथे क्रांतीच्या गट कार्यालयांचा शुभारंभ

क्रांती WAVE वृत्तसेवा

सांगली : खानापूर, कवठेमहांकाळ, जत व सांगोला तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याशी अधिक सुलभतेने जोडता यावे, तसेच ऊस नोंदणी व नियोजनाची प्रक्रिया स्थानिक पातळीवर सोयीची व्हावी, यासाठी घानवड व शिरढोण येथे ऊस गट कार्यालये सुरू करण्यात येत आहेत.

घानवड येथे सकाळी, तर शिरढोण येथे दुपारी शुभारंभ

घानवड येथील ऊस गट कार्यालयाचा शुभारंभ बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. हा कार्यक्रम चंदन स्टील हार्डवेअरसमोर, विटा-मायणी रोड, घानवड, ता. खानापूर, जि. सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे.

शिरढोण येथील ऊस गट कार्यालयाचा शुभारंभ त्याच दिवशी दुपारी १ वाजता होणार असून, कार्यक्रमाचे ठिकाण जे. जे. इन हॉटेलजवळ, मिरज-पंढरपूर रोड, शिरढोण, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली असे आहे.

ऊस उत्पादकांना नोंदणी व नियोजनासाठी सुविधा

परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना क्रांती साखर कारखान्याशी अधिक सुलभतेने जोडता यावे, तसेच उपलब्ध होणाऱ्या उसाची प्रभावी नोंदणी व नियोजन करता यावे, या उद्देशाने ही ऊस गट कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याशी संबंधित कामांसाठी स्थानिक पातळीवर संपर्काची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या दोन्ही कार्यक्रमांना क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि., कुंडलचे चेअरमन शरद लाड यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, संचालक मंडळ व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!