शेती

ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन ४ ऑक्टोबरला सांगलीत

ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन ४ ऑक्टोबरला सांगलीत
30 Sep 2026, 19:33 291 views

सांगली : क्रांती WAVE वृत्तसेवा

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सांगलीत करण्यात आले आहे. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, नेमिनाथ नगर येथे होणाऱ्या या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिकांचा सहभाग राहणार असून साहित्य, ज्येष्ठत्व आणि सांस्कृतिक जीवनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन सायंकाळी ४ वाजता यशदा, पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

सायंकाळी ५ वाजता ‘आनंदी वृद्धत्व आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक व कवी प्रा. दीनानाथ सुंगारे राहणार आहेत. परिसंवादात ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल मडके आणि डॉ. दिलीप शिंदे सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ६ वाजता कवी संमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ. दिलीप कुलकर्णी राहणार आहेत.

या साहित्य संमेलनासाठी संयोजक म्हणून प्रा. संजय ठिगळे काम पाहत आहेत. उपाध्यक्ष डॉ. अनिल मडके व प्रमोद चौगुले, कार्यवाह वर्षा चौगुले व अभिजीत पाटील, तर कोषाध्यक्ष सचिन पाटील आहेत. कार्यकारिणी सदस्य म्हणून महेश कराडकर, भीमराव धुळूबुळू, मनीषा पाटील, डॉ. भीमराव पाटील, कुलदीप देवकुळे, लता ऐवळे, प्रदीप सुतार, महादेव माने आणि डॉ. दिलीप शिंदे (स्वीकृत सदस्य) यांचा सहभाग आहे. प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर हे स्वीकृत सदस्य असून सल्लागार मंडळही कार्यरत आहे.

दिनांक : रविवार, ४ ऑक्टोबर २०२६
स्थळ : श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, नेमिनाथ नगर, सांगली.

साहित्यप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, लेखक, कवी आणि रसिकांनी या साहित्य संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!