नोकरी

आभासी जगातील स्मार्ट करिअर!

आभासी जगातील स्मार्ट करिअर!
08 Jul 2026, 23:32 39 views

आभासी जगातील स्मार्ट करिअर!

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरु केलेले अभ्यासक्रम हे डिजिटल माध्यमांमध्ये रोजगाराच्या संधी मिळवण्यापासून ते स्वत:चे स्थान बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे कौशल्य आणि तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती दिली जाते. या संस्थेने पुढील एक वर्षं कालावधीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. (१) डिप्लोमा इन आर्ट ऑफ कॅरेक्टर ॲण्ड क्रिएचर ॲनिमेशन- हा पदविका अभ्यासक्रम 'मल्टीमीडिया' पदवीधर आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी आहे. हा अभ्यासक्रम ॲनिमेशन आणि गेमिंग उद्योगामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देतो.करिअर संधी- (१) कॅरेक्टर ॲनिमेटर: पात्रांना हालचाली आणि भावना देणारा तज्ज्ञ, (२) क्रिएचर आणि नॉन-ह्युमन ॲनिमेटर: प्राणी आणि मानवेतर पात्रांचे (उदा. ड्रॅगन, मॉन्स्टर्स) वास्तववादी ॲनिमेशन करणारा तंत्रज्ञ, (३) मोशन कॅप्चर आर्टिस्ट: मानवी हालचाली रेकॉर्ड करून, त्या डिजिटल पात्रांना देणारा तंत्रज्ञ, (४) ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर)/ व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) ॲनिमेटर: ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीसाठी ॲनिमेशन तयार करणारा तज्ज्ञ, (५) ॲनिमेशन टेक्निकल डायरेक्टर : ॲनिमेशन प्रक्रियेतील तांत्रिक बाजू आणि सॉफ्टवेअरची गुंतागुंत हाताळणारा तंत्रज्ञ, (६) प्रिव्हिज / ले-आउट आर्टिस्ट : अंतिम दृश्यापूर्वीची प्राथमिक मांडणी आणि कॅमेरा हाताळणारा तंत्रज्ञ, (७) ॲनिमेशन पाईपलाईन को-ऑर्डिनेटर: निर्मिती प्रक्रियेतील विविध विभागांमध्ये समन्वय राखणारा व्यवस्थापक.(२) डिप्लोमा इन फिल्म टेक्नॉलॉजी ॲण्ड पोस्ट प्रॉडक्शन- या अभ्यासक्रमात प्रामुख्याने 'पोस्ट-प्रॉडक्शन (निर्मिती पूर्ण झाल्यानंतरच्या विविध प्रकिया)’ मधील कौशल्ये, सर्जनशील विचार आणि उद्योगासाठी आवश्यक व्यावसायिकता यावर विशेष भर दिला जातो.करिअर संधी- (१) मॅनेजर पोस्ट प्रॉडक्शन: निर्मितीपश्चात कामाचे संपूर्ण व्यवस्थापन पाहणारा प्रमुख, (२) पोस्ट प्रोड्युसर: पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेचे नियोजन आणि अंमलबजावणी करणारा निर्माता, (३) व्हीएफएक्स प्रोड्युसर: व्हिज्युअल इफेक्ट्सच्या निर्मितीचा आणि बजेटचा कार्यभार सांभाळणारा निर्माता, (४) व्हीएफक्स प्रोडक्शन को-ऑर्डिनेटर:  विविध कलाकार आणि तंत्रज्ञांमध्ये समन्वय राखणारा अधिकारी, (५) ॲसेट मॅनेजर: डिजिटल फाइल्स, मॉडेल्स आणि इतर तांत्रिक संसाधनांचे सुव्यवस्थित जतन आणि व्यवस्थापन करणारा तज्ज्ञ, (६) कंटेंट क्रिएटर: विविध माध्यमांसाठी नाविन्यपूर्ण आशय किंवा मजकूर तयार करणारा तज्ज्ञ, (७) पोस्ट सुपरवायझर: संपूर्ण पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेवर तांत्रिक देखरेख ठेवणारा पर्यवेक्षक, (८) एडिट सुपरवायझर: संपादन विभागाचे संनियंत्रण करुन चित्रपटाला अंतिम रुप देणारा तंत्रज्ञ.(३) डिप्लोमा इन व्हीज्युअल इफेक्ट्स मास्टरी- या अभ्यासक्रमात कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयाचे तंत्र शिकवले जाते. यामध्ये कलात्मकतेच्या मूलभूत तत्त्वांपासून ते प्रगत 'रिअल-टाइम रेंडरिंग (या तंत्रज्ञानाव्दारे संगणक, प्रचंड वेगाने प्रतिमा तयार करतो. त्या दर्शकांना एका सेकंदात ३० ते ६० फ्रेम्सच्या स्वरूपात दिसतात. त्यामुळे ते दृश्य 'प्रत्यक्ष' घडत असल्याचा अनुभव येतो.) आणि 'व्हर्च्युअल प्रॉडक्शन (ही चित्रपट निर्मितीची एक प्रगत पद्धत असून यामध्ये रिअल-टाइम रेंडरिंग आणि प्रत्यक्ष चित्रिकरण यांचा समन्वय साधला जातो.)' पर्यंतच्या सर्व विषयांचे ज्ञान प्रदान केले जाते. या उद्योगासाठी आवश्यक अत्याधुनिक साधनांचा वापर करून संपूर्ण व्हीएफएक्स प्रक्रिया शिकवली जाते.करिअर संधी- (१) कंपोझिटर/कंप आर्टिस्ट: प्रत्यक्ष चित्रीकरण  आणि संगणकीय दृश्ये यांचे अचूक एकत्रीकरण करणारा तंत्रज्ञ, (२) मॅच मूव्ह/ ट्रॅकिंग आर्टिस्ट: कॅमेरा आणि वस्तूंमधील हालचालींचा मागोवा घेणारा तंत्रज्ञ, (३) रोटो/पेंट आर्टिस्ट: रोटोस्कोपी (प्रत्यक्ष चित्रित केलेल्या फिल्ममधील हालचालींना फ्रेम-टू-फ्रेम वापरुन अ‍ॅनिमेशन तयार करण्याचे तंत्र) आणि दृश्यांमधील अनावश्यक गोष्टी काढणारा तंत्रज्ञ, (४) लायटिंग आर्टिस्ट: थ्री डी दृश्यांमध्ये प्रकाशयोजना आणि रेंडरिंग करणारा तंत्रज्ञ, (५) रिअल-टाइम व्हीएफक्स आर्टिस्ट: अनरिअल इंजिन आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शनमधील तज्ज्ञ, (६) व्हीएफएक्स सुपरवायझर: सर्जनशील आणि तांत्रिक विभागाचे नेतृत्व करणारा तंत्रज्ञ, (७) प्रोड्युसर/को-ऑर्डिनेटर: निर्मिती, व्यवस्थापन आणि ग्राहकाशी व्यावसायिक वाटाघाटी करणारा व्यवस्थापक, (९) लीड आर्टिस्ट: संबंधित विभागाचा प्रमुख आणि टीमचे नेतृत्व करणारा व्यवस्थापक, (१०) तांत्रिक संचालक: निर्मिती प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणारा तंत्रज्ञ, (११) व्हर्च्युअल प्रॉडक्शन सुपरवायझर(४) डिप्लोमा इन थ्री डी कॅरेक्टर ॲण्ड क्रिएचर डिझाइन ॲण्ड वर्ल्ड बिल्डिंग- या अभ्यासक्रमात गेम डेव्हलपमेंटमध्ये वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रकौशल्य शिकवले जाते. संकल्पनेपासून  ते अंतिम सादरीकरणापर्यंत, 'गेम  मधील' पात्रे तयार करण्यासाठी लागणारे ज्ञान प्रदान केले जाते.करिअर संधी- (१) ज्युनिअर कॅरेक्टर आर्टिस्ट: पात्रांच्या निर्मितीचे प्राथमिक काम करणारा तंत्रज्ञ, (२) थ्रीडी कॅरेक्टर मॉडेलर: पात्रांना संगणकावर त्रिमितीय आकार देणारा तंत्रज्ञ, (३) टेक्सचर आर्टिस्ट: पात्रांची त्वचा, कपडे आणि इतर पृष्ठभागांना रंग आणि पोत देणारा तंत्रज्ञ, (४) ॲसेट आर्टिस्ट: गेममधील विविध वस्तू आणि संसाधने तयार करणारा तंत्रज्ञ, (५) कॅरेक्टर आर्टिस्ट: पात्रांची रचना आणि मांडणी करणारा तंत्रज्ञ, (६) सिनिअर कॅरेक्टर आर्टिस्ट: पात्रांच्या निर्मितीमधील गुंतागुंतीची कामे हाताळणारा तंत्रज्ञ, (७) लीड कॅरेक्टर आर्टिस्ट: पूर्ण टीमचे नेतृत्व करणारा आणि कलात्मक दिशा ठरवणारा व्यवस्थापक, (८) प्रिन्सिपल आर्टिस्ट: पात्रांच्या रचनेतील तांत्रिक आणि कलात्मक बाबी बघणारा तंत्रज्ञ.(५) डिप्लोमा इन थ्री डी टेक्निकल आर्टिस्ट -या अभ्यासक्रमात लायटिंग (प्रकाशयोजना), व्हिज्युअल इफेक्ट्स (एफएक्स) आणि डिजिटल ग्रूमिंग ही कौशल्ये शिकवली जातात. यामुळे चित्रपट आणि गेम्समध्ये दिसणाऱ्या अदभूत आभासी जगाची निर्मिती करण्याची क्षमता प्राप्त करतो येते.करिअर संधी- (१) व्हिज्युअल इफेक्ट्स, (२) अ‍ॅनिमेशन, (३)  गेम डेव्हलपमेंट(६) डिप्लोमा इन इंटरॲक्टिव्ह कॉमिस ॲण्ड सिक्वेंशिअल आर्ट-  हा सुपर-स्पेशलायझेशन अभ्यासक्रम आहे. कला आणि चित्रकलेचे मूलभूत ज्ञान असणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमामध्ये व्हिज्युअल कथा लेखन, त्याची निर्मिती आणि प्रकाशन करण्याची व्यावसायिक प्रक्रिया या तीन बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. व्यावसायिक 'बौद्धिक संपदा'  विकसित करण्यावर भर दिला जातो. कन्सेप्ट आर्ट, डिजिटल इंकिंग, कलरिंग आणि अ‍ॅनिमेशन व साऊंड डिझाइनसह 'मोशन कॉमिक (यामध्ये स्थिर प्रतिमांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हालचाल प्रदान केली जाते, ज्यामुळे कॉमिक्स वाचण्याचा अनुभव अधिक सजीव होतो.)' निर्मितीमधील प्रगत तंत्रांमध्ये विद्यार्थी प्राविण्य मिळवतात. करिअर संधी- (१) कन्सेप्ट आर्टिस्ट, (२) स्टोरीबोर्ड आर्टिस्ट,  (३) कॉमिक बुक आर्टिस्ट / इंकर / कलररिस्ट, (४) कॅरेक्टर डिझायनर, (५) मोशन ग्राफिक्स आर्टिस्ट, (६) टू डी गेम आर्टिस्ट, (७) ग्रॅफिक नॅरेटिव्हिस्ट / ग्रॅफिक नॉव्हेलिस्ट(७) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एक्सटेंडेड रिॲलिटी फॉर इंटरॲक्टिव्ह फिजिटल एक्सपिरिअंस (फिजिटल' हा शब्द फिजिकल (प्रत्यक्ष) आणि डिजिटल या दोन शब्दांच्या समन्वयातून तयार झालाय. या तंत्राव्दारे एखाद्या ब्रँड किंवा संस्थेला, ग्राहकांना भौतिक जगातील स्पर्श आणि डिजिटल जगातील वेग यांचा अनुभव एकाच वेळी देता येतो.) - एक्स्टेंटेड रिॲलिटी (एक्सआर) आणि ह्युमन कॉम्प्युटर इंटरॲक्शन आणि युझर एक्सपिरिअंस या क्षेत्रातील उद्योगात करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो.करिअर संधी- १) एक्सआर एक्सपीरियन्स डिझायनर -  (१) एक्सआर-  इंटरअॅक्शन डिझाइनर, (२) ब्रँड एक्सपीरियन्स आर्किटेक्ट, (३) मेटाव्हर्स कंटेंट डिझाइनर, (४) स्पॅशिअल युझर एक्सपिरिअंस डिझाइनर (स्पॅशिअल डिझाइन- डिजिटल घटकांना सभोवतालच्या प्रत्यक्ष जगात नैसर्गिकरित्या गुंफण्याचे तंत्र. यामध्ये वापरकर्ता डिजिटल वातावरणाचा भाग बनतो.), (५) गेम डिझाइनर, (६) फिजिटल  एक्सपीरियन्स डिझाइनर, (७) एक्सआर- प्रॉडक्ट मॅनेजर, (८) इंटरअॅक्टिव्ह रिटेल डिझाइनर २) एक्सआर विकासक (डेव्हलपर):(१) व्हीआर (व्‍हर्च्युअल रिॲलिटी)/ एआर (ऑगमेंटेड रिॲलिटी) / एमआर (मिक्स्ड रिॲलिटी) डेव्हलपर, (२) गेम डेव्हलपर, (३) एक्सआर- आर्किटेक्ट, (४) गेम आर्किटेक्ट, (५) थ्री डी अ‍ॅसेट्स डेव्हलपर. ३) एक्सआर उद्योजकता- (१) एक्सआर/गेम गॅजेट्स किंवा उपकरणांची निर्मिती, (२) एक्सआर/गेम सोल्यूशन्स किंवा सेवा पुरवणे, (३) एक्सआर /गेम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट४) एक्सआर प्रगत शिक्षण-  आयआयसीटीमधील प्रगत पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम, परदेशातील नामांकित विद्यापीठेसंपर्क संकेतस्थळ- https://www.iict.org सुरेश वांदिले
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!