हटके

प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का ? नाही ...

प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का ? नाही ...
08 Jul 2026, 22:48
प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का ? नाही ... ते समुद्र मंथन वगैरे सोडून आणि एक आख्यायिका सांगितली जाते.ही एक राजकुमारी ! तेजोमय सूर्यावर आसक्त ! राजकुमारीच ती; तिचा हट्ट राजान पुरवला. सूर्य देवाला साकडं घातलं गेलं,अन भूलोकीचं ते अनोखं मागणं सूर्य देवानं स्वीकारलं.त्याच्या होकाराला धरून लग्न ठरलं. पण लग्न घटिकेला सूर्य देव फिरकलेच नाहीत. विवाह वेदीवर अपमानित ती बालिका स्व-अग्नीत जळून खाक झाली. अन तेथे उगवलं हे स्वर्गीय अद्भुत रोपट...सुर्यावरील रागाने ती बाकीच्या फुलांसारखी सूर्योदयाला नाही उमलत. ना ही तिची फुलं कधी उमलून डोलतात. बस उमललेलं प्रत्येक फुल मूक अश्रु सारख टप टप टप टप गळतं..!!
कविता माझी नाही ना या कहाणीवर आहे. पण एक संदर्भ !! हे फक्त त्या सुगन्धी प्राजक्ताच वर्णन.
प्राजक्त
पाच पाकळ्या प्राजक्ताच्या ;सान चिमुकल्या ; फक्त पांढऱ्या.देठ ही इवला; संथ केशरी,देह हलका हवेहूनही ॥
उठण्या आधी भ्रमर पाखरे,फुलण्या आधी प्रफ्फुल्ल किरणे,लपून कोपरी फुलूनी गेलालाजरा प्राजक्त केंव्हाचा ॥
नाही मादक; ना माळण्या,स्पर्श कुणाचा कधी न भावला,धरला हाती; त्वरित मळला,सुकुमार प्राजक्त हा ॥
उपमा याला कवी मनाची,आणिक कोवळ्या बाल प्रीतीची,नाजूक हळू गुणगुणण्याची ,नि:शब्द चांदण्या रातीची ॥
फुलण्यासाठी, फुलून गेलालकेर मनीची खुलवीत गेला,तरंग सुगंधी उठवीत गेला,एकला प्राजक्त हा ॥
#पारिजातक #gardeninglife
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!