महाराष्ट्र

नंदीवाले समाजाच्या सभामंडपाचे लोकार्पण; सामाजिक-धार्मिक उपक्रमांना मिळणार चालना

नंदीवाले समाजाच्या सभामंडपाचे लोकार्पण; सामाजिक-धार्मिक उपक्रमांना मिळणार चालना
31 Jul 2026, 20:24 51 views

पलूस :  येथील नंदीवाले समाजाच्या मागणीनुसार उभारण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत आमदार अरुण (अण्णा) लाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या निधीतून या सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे.

सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार अरुण लाड यांच्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे युवा नेते  शरद लाड यांनी सांगितले की, या सभामंडपामुळे नंदीवाले समाजाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध झाली आहे. समाजाच्या विविध उपक्रमांना यामुळे निश्चितच मोठी चालना मिळणार असून ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता झाली आहे. लोकार्पण सोहळ्यास विविध मान्यवर, नंदीवाले समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!