19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजून 38 सेकंदापर्यंतच्या SIR Status Report नुसार, जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये Enumeration Forms छपाई आणि वितरणाची प्रक्रिया 100 टक्के पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 2,482 BLO प्रशिक्षित झाले असून, प्रत्येक BLO कडे सरासरी 1,037 मतदार आहेत.
282-सांगली विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 65 हजार 272 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 74 हजार 614 फॉर्म डिजिटल झाले आहेत. 90 हजार 658 फॉर्म Uncollectable असून, हे प्रमाण 24.82 टक्के आहे. जिल्ह्यातील आठही मतदारसंघांमध्ये हा सर्वाधिक आकडा आहे. सांगली मतदारसंघात 5,212 ASD discrepancies, 19,727 DSE, 6,341 PSE आणि 27,155 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
281-मिरज (SC) मतदारसंघात एकूण 3 लाख 49 हजार 527 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 94 हजार 571 फॉर्म डिजिटल झाले आहेत. 54 हजार 956 फॉर्म Uncollectable आहेत. हे प्रमाण 15.72 टक्के आहे. या मतदारसंघात 4,502 ASD discrepancies, 17,453 DSE, 5,012 PSE आणि 26,523 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
283-इस्लामपूर मतदारसंघात एकूण 2 लाख 84 हजार 367 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 43 हजार 45 फॉर्म डिजिटल झाले आहेत. 41 हजार 322 फॉर्म Uncollectable असून, त्याचे प्रमाण 14.53 टक्के आहे. इस्लामपूरमध्ये 5,096 ASD discrepancies, 22,664 DSE, 3,284 PSE आणि 18,563 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
284-शिराळा मतदारसंघात एकूण 3 लाख 8 हजार 602 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 76 हजार 659 फॉर्म डिजिटल झाले आहेत. 31 हजार 943 फॉर्म Uncollectable असून, त्याचे प्रमाण 10.35 टक्के आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये Uncollectable Forms चे सर्वात कमी प्रमाण शिराळा मतदारसंघात आहे. शिराळ्यात 4,990 ASD discrepancies, 35,102 DSE, 3,187 PSE आणि 17,695 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
285-पलूस-कडेगाव मतदारसंघात एकूण 2 लाख 92 हजार 126 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 53 हजार 436 फॉर्म डिजिटल झाले आहेत. 38 हजार 690 फॉर्म Uncollectable असून, हे प्रमाण 13.24 टक्के आहे. या मतदारसंघात 4,580 ASD discrepancies, 24,231 DSE, 3,312 PSE आणि 5,331 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
286-खानापूर मतदारसंघात एकूण 3 लाख 57 हजार 200 मतदार आहेत. त्यापैकी 3 लाख 12 हजार 384 फॉर्म डिजिटल झाले आहेत. 44 हजार 816 फॉर्म Uncollectable आहेत. हे प्रमाण 12.55 टक्के आहे. खानापूरमध्ये 6,204 ASD discrepancies, 23,087 DSE, 4,665 PSE आणि 24,302 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
287-तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात एकूण 3 लाख 18 हजार 621 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 75 हजार 945 फॉर्म डिजिटल झाले आहेत. 42 हजार 676 फॉर्म Uncollectable असून, हे प्रमाण 13.39 टक्के आहे. या मतदारसंघात 6,700 ASD discrepancies, 26,121 DSE, 3,455 PSE आणि 24,437 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
288-जत मतदारसंघात एकूण 2 लाख 97 हजार 624 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 60 हजार 472 फॉर्म डिजिटल झाले आहेत. 37 हजार 152 फॉर्म Uncollectable असून, हे प्रमाण 12.48 टक्के आहे. जत मतदारसंघात 4,370 ASD discrepancies, 8,081 DSE, 3,391 PSE आणि 15,549 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 25 लाख 73 हजार 339 मतदार आहेत. त्यापैकी 21 लाख 91 हजार 126 मतदारांचे फॉर्म डिजिटल झाले आहेत. तर 3 लाख 82 हजार 213 फॉर्म Uncollectable आहेत. हे प्रमाण 14.85 टक्के आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक Uncollectable Forms सांगली मतदारसंघात 90,658 आहेत. त्यानंतर मिरज 54,956, खानापूर 44,816, तासगाव-कवठेमहांकाळ 42,676, इस्लामपूर 41,322, पलूस-कडेगाव 38,690, जत 37,152 आणि शिराळा 31,943 असा क्रम आहे.
SIR अहवालात जिल्ह्यात एकूण 41,654 ASD discrepancies, 1,76,466 DSE, 32,647 PSE आणि 1,59,555 anomalies नोंदविण्यात आल्या आहेत.
‘Uncollectable Forms’ म्हणजे संबंधित फॉर्म उपलब्ध अथवा संकलित न झाल्याची नोंद. त्यामुळे 3 लाख 82 हजार 213 मतदार सध्या प्रत्यक्ष मतदार यादीतून कमी झाले आहेत, असे म्हणता येणार नाही. पुढील पडताळणी, दावे आणि हरकतींच्या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादीत किती नावे कायम राहतात आणि किती नावे वगळली जातात, हे स्पष्ट होणार आहे.
मात्र, SIR Status Report मधील सध्याच्या आकडेवारीमुळे सांगली जिल्ह्यातील 14.85 टक्के मतदारांचे भवितव्य अंतिम पुनरीक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीकडे जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!