महाराष्ट्र

पदवीधर मतदार नोंदणी अभियान व्यापक बनवा : शरद लाड

पदवीधर मतदार नोंदणी अभियान व्यापक बनवा : शरद लाड
25 Jul 2026, 19:29

इचलकरंजी : पदवीधर मतदार नोंदणी अभियान अधिक व्यापक, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने राबवून प्रत्येक पात्र पदवीधराची मतदार म्हणून नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन शरद लाड यांनी केले.

इचलकरंजी महानगरपालिका येथे पदवीधर मतदार नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत पदवीधर मतदार नोंदणी अभियान अधिक व्यापक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक नियोजन, जनजागृती आणि समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक पात्र पदवीधरापर्यंत पोहोचून त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रभावी जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

"लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र पदवीधराने मतदार म्हणून नाव नोंदविणे आवश्यक आहे. पदवीधर मतदार नोंदणी अभियान अधिक व्यापक बनवून एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत," असे शरद लाड यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध स्तरांवर जनजागृती करण्यावर भर देत, पदवीधरांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (1)
दशरथ कृष्णत यादव 26 Jul 2026 12:59

क्रांती सहकारी जे. डी. बापूसाहेब लाड साखर कारखाना कुंडल चे मा. चेअरमन शरद भाऊ अरुण आण्णा लाड हे पुढील पदवीधर आमदार आहेत