महाराष्ट्र

पश्चिम घाटात अतिमुसळधार पावसाची शक्यता

पश्चिम घाटात अतिमुसळधार पावसाची शक्यता
22 Jul 2026, 09:22
पुढील 48 तासांत पुणे घाट भाग, पुणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये (मुंबईसह) आणि नाशिक, सातारा व कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं पुढील 48 तासांत पुणे घाट, उत्तर-पश्चिम कोकणातील भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पर्यटन किंवा अनावश्यक प्रवास टाळावा.  मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. नाशिकच्या घाट भागात बुधवार आणि गुरुवारी अतिमुसळधार पाऊस पडेल.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!