पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील SIR अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत आगामी कार्याचे नियोजन, बूथस्तरावरील जबाबदाऱ्या, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील समन्वय तसेच मतदारांपर्यंत अभियानाची अचूक माहिती पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मतदार यादीतील नोंदी अचूक असणे आवश्यक असून, मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी बूथस्तरावर प्रभावीपणे काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आवश्यक माहिती देणे आणि अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडीक, आमदार धैर्यशील कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, युवा नेते रविराज देशमुख यांच्यासह मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्तरीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुसंघटित नियोजन, प्रभावी जनसंपर्क आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याच्या निर्धाराने SIR अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा संकल्प यावेळी केला.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!