राज्यात शेतकरी कर्जमाफीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी सुरू असून, या प्रक्रियेची तयारी कृषिमंत्री बाबासाहेब पाटील करत असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार, याबाबत अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!