महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर, कोयना धरण 33 टक्के भरले

सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर, कोयना धरण 33 टक्के भरले
08 Jul 2026, 07:51

सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर  : कोयना धरण 33 टक्क्यांहून अधिक भरले.

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणात बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 36 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 33.93 टक्के भरले आहे. धरणात 93 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.7 जुलैअखेर सातारा जिल्ह्यात सरासरी 288.7 मिमी पर्जन्यमान झाले आहे. मंगळवारी जिल्ह्यातील 22 महसूल मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामध्ये महाबळेश्वर महसूल मंडळात सर्वाधिक 392.8 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय लामज, बामणोली आणि तापोळा येथे प्रत्येकी 169 मिमी, वाठार 148.5 मिमी, पाचगणी 136.5 मिमी, करहर आणि केळघर येथे प्रत्येकी 124.5 मिमी, पसरणी 110.3 मिमी आणि पाटण 100.5 मिमी पावसाची नोंद झाली.90 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरसततच्या मुसळधार पावसामुळे धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे प्रशासनाकडून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील नावली (7), धावली (17) आणि रुळे (8) येथील मिळून 32 नागरिक, जावली तालुक्यातील बहुले (23) आणि बोंडारवाडी (8) येथील 31 नागरिक, तसेच वाई तालुक्यातील जांभळी (22) आणि डोईचीवाडी (5) येथील 27 नागरिक अशा एकूण 90 नागरिकांना अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, मंदिरे व नातेवाईकांच्या घरी सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे.83 घरांचे नुकसानअतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये 83 घरांची पडझड झाली आहे. यामध्ये पाटण तालुक्यात 39, सातारा तालुक्यात 9, खंडाळा तालुक्यात 2, जावली तालुक्यात 11, वाई तालुक्यात 13 आणि महाबळेश्वर तालुक्यात 9 घरांचे नुकसान झाले आहे. संबंधित घरांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.शाळा व सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसानसातारा तालुक्यातील केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. तर खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा आणि स्मशानभूमीची संरक्षणभिंत कोसळून नुकसान झाले आहे.पर्यटनस्थळांवर निर्बंधसततच्या पावसामुळे धबधबे, पाणी साचणारे सखल भाग आणि धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. प्रमुख धरणांतील पाणीसाठाकोयना - 35.71 टीएमसी (क्षमता 105.25 टीएमसी) - 33.93%
धोम - 6.59 टीएमसी (क्षमता 13.50 टीएमसी) - 48.81%
धोम-बलकवडी - 2.17 टीएमसी (क्षमता 4.08 टीएमसी) - 53.19%
कण्हेर - 6.29 टीएमसी (क्षमता 10.10 टीएमसी) - 62.28%
उरमोडी - 4.50 टीएमसी (क्षमता 9.96 टीएमसी) - 45.18%
तारळी - 1.73 टीएमसी (क्षमता 5.85 टीएमसी) - 29.57%यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देशपावसामुळे झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे, रस्ते खचणे अशा घटनांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहून तातडीने रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, तसेच दरडप्रवण आणि धोकादायक भागातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यकतेनुसार त्यांचे तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!