महाराष्ट्र

क्रांती अर्बनचा ११ टक्के लाभांश जाहीर; व्यवसायाने ओलांडला १०१ कोटींचा टप्पा

क्रांती अर्बनचा ११ टक्के लाभांश जाहीर; व्यवसायाने ओलांडला १०१ कोटींचा टप्पा
02 Aug 2026, 13:16

पलूस | प्रतिनिधी

क्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आर्थिक प्रगतीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत १०१ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय पूर्ण केला आहे. अहवाल वर्षासाठी सभासदांना ११ टक्के लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला असून, सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांच्या भक्कम विश्वास व पाठबळामुळे संस्थेची सातत्याने प्रगती होत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील यांनी केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक शरद लाड यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यात सभासदांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, असे सांगताना अल्पावधीतच सहकार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या क्रांती अर्बनचा विकासाचा आलेख भविष्यातही अशाच वेगाने उंचावत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

क्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची ९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालय, पलूस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून धन्यकुमार पाटील बोलत होते.

प्रारंभी सहकार क्षेत्रातील अभ्यासक प्रा. अरुण गुजले यांनी सहकार चळवळीचे महत्त्व, आर्थिक शिस्त आणि संस्थात्मक विकास या विषयांवर उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पंकज पाटील यांनी अहवाल वर्षात दिवंगत झालेले देशातील मान्यवर नागरिक, सैनिक तसेच संस्थेचे सभासद व खातेदार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

प्रास्ताविक व स्वागत उपाध्यक्ष प्रथमेश दिवटे यांनी केले. वार्षिक अहवाल अध्यक्ष धन्यकुमार पाटील यांनी सादर केला, तर नोटीस व ताळेबंदाचे वाचन व्यवस्थापक सागर रेपाळ यांनी केले. सभासदांनी सभेपुढील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.

यंदाच्या आर्थिक वर्षात संस्थेला 'अ' वर्ग प्राप्त झाला आहे. संस्थेकडे सध्या ६० कोटी रुपयांच्या ठेवी, ४३ कोटी रुपयांचे कर्जवाटप असून, एकूण व्यवसायाने १०१ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

क्रांती अर्बन ही संस्था सहकारअग्रणी आमदार अरुण   लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या सहकार, सेवा आणि विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेत विश्वासार्ह कामकाजाची परंपरा कायम ठेवत आहे.

यावेळी ॲड. सतीश चौगुले, दिलीप जाधव, सुरेश शिंदे, सुरेश देशमुख, जे. आर. पाटील, घनश्याम पोळ, वसंत पाटील, प्रमोद माने, शिवाजी केसरे, संदीप क्षीरसागर, हनमंत मोहिते, संभाजी पाटील, मोहन मोरे, सचिन महाडिक, सुशांत पाटील, रत्नदीप माने, राजेंद्र चौगुले, उदय साळुंखे, तानाजी मोकाशी, विशाल शिंदे तसेच संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विनोद पाणबुडे यांनी मानले. 


शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!