कुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच ज्येष्ठ सहकार नेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम श्रद्धाभावाने संपन्न झाला. कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित या कार्यक्रमात तिन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा आमदार अरुण लाड, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे आणि राजारामबापू पाटील यांच्या कार्याचे गौरवपूर्ण स्मरण केले.
यावेळी मान्यवरांनी सांगितले की, लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप देत देशवासियांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना वाचा फोडत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. तर स्व. राजारामबापू पाटील यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देत शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.
या तिन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समाजाला आजही प्रेरणा देणारा असून त्यांच्या आदर्शांचा अवलंब करून सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि विकासाची वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास कारखान्याचे कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, सेक्रेटरी, कार्यालयीन अधीक्षक, विविध विभागप्रमुख, अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी तिन्ही महान विभूतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!