- "जाणून बुजून दुर्लक्षित केलेल्या उड्या "
1) संभाजी महाराजांच्या काळात,कान्होजी आंग्रे यानी सिद्दी व मोगल यांच्या कैदेतुन खाडीत उडी मारली पहाटे ४ किमी पोहुन ही गेले व पुढे दर्या सारंग ही झाले..!!
2) जी.डी.बापू पाटील, नागनाथ अण्णा यांनी दोघा सहकाऱ्याना सोबत घेऊन पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि बंदुका पळवल्या. पुढे जेव्हा बंदूकाचा तुटवडा भासू लागला तेव्हा दोघांनी पोर्तुगीज गोव्यातून शस्त्रास्त्रांच्या तस्करीचा एक आराखडा विकसित केला आणि काही बंदुका या गोव्याच्या मार्गाने प्रतीसरकारला मिळाल्या.
बाळ जोशी या क्रांतीकारकाला पकडून पोर्तुगिजांनी त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती.
क्रांतीसिंह नाना पाटील यांनी पणजीची मोठी खाडी पोहून पार केली आणि पणजीचा तुरुंगांतुन बाळ जोशीं ना मदत करत सुटका केली! बाळ जोशी , व नाना पाटील दोघे मांडवी नदीची खाडी ओलांडुन ३ किमी पोहुन आजरा कोल्हापुर मार्गे पश्चिम महाराष्ट्रात परत आले. गंगाधर चिटणीस यांचे हे जोशी नातेवाईक होते व बाळ जोशीं देशस्थ ब्राह्मण होते.
चिटणीस यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना आपल्या उसाच्या शेतात अनेक वर्षे लपवले व त्यांना जेवणाचे डबे देण्याचे काम डॉ अण्णा देशपांडे यांनी केले. पुढे डॉ अण्णा च्या नावे ही ब्रिटीशांनी वॉरंट काढल्याने त्यां डॉक्टरांना ही भूमिगत व्हावे लागले.
खुद्द नानासिंह पाटील यांनाही ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्यानंतर, रेल्वेतून घेऊन जात असताना त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रात रेल्वे मधूनच उडी मारली (राजेश खन्नाच्या रोटी चित्रपटांमध्ये हा सीन कॉपी केला आहे)
६० फुट नदीपात्रात उडी मारल्यानंतर सुद्धा नानांच्या हातामध्ये लोखंडी बेड्या होत्या त्या काळामध्ये स्टीलच्या हातकड्या नव्हत्या त्यामुळे पोहून गेल्यानंतर त्यांनी एका स्थानिक लोहाराची मदत घेऊन त्या बेड्या तोडल्या आणि भूमिगत झाले.
नानासिंह पाटील यांनी नंतर सांगितल्याप्रमाणे औंधच्या महाराजांनी म्हणजे पंतप्रतिनिधी नी त्यांना संस्थानांमध्ये तब्बल 42 ते 46 असे लपवले. ते चार वर्षे भूमिगत राहिले संस्थानाच्या वेगवेगळ्या भागात फिरत राहिले दुर्दैवाने या काळात त्यांची जेव्हा आई वारली तेव्हा ते वेशांतर करून आईच्या अंत्यसंस्काराला आले आणि ब्रिटिश हेर जे दबा धरून बसले होते की "अंत्यसंस्काराच्या वेळेला आलेल्या नानांना पकडू " त्यांनाही त्यांनी गुंगारा दिला !
बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधींचा त्यांनी मदतीबद्दल नानांनी कौतुकाने उल्लेख केला होता.
3) "वसंतदादा पाटील यांची ऐतिहासीक उडी " :- भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेकांनी योगदान दिले आहे. त्यावेळच्या ' सांगली संस्थान ' मधे अनेकांनी ब्रिटिश सरकार विरोधात स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली होती. जेलमधे ठेवले तरी गप्प बसून राहणारे ते स्वातंत्र्यसैनिक नव्हते. सहकार्या सोबत नियोजन करून भर पावसात, पोलीस अधिकार्यांच्या हातावर तूरी देऊन तुरुंगाच्या भिंतीवरून खंदकाच्या बाजूने उड्या टाकून ९० फुट खोल कृष्णा नदी पोहत ओलांडली.
सांगली संस्थानचे पोलीस गोळीबार करीत होते. गोळ्या चुकवत त्यांनी नदीत उड्या मारल्या.या वेळी वसंतदादा पाटील, बाबूराव जाधव यांना गोळ्या लागल्या.यात बाबूराव जाधव यांना वीरगती लाभली व वसंतदादा पाटील पाठीला गोळी लागून जखमी अवस्थेत निसटले.
आण्णासाहेब पत्रावळे हे स्वातंत्र्य सैनिक नदीच्या मळीच्या रानात चिखलात पाय अडकल्यामुळे गोळीबारात हुतात्मा झाले.
मांडवी नदीची ही ती ३ किमी खाडी जी बाळ जोशी व नाना पाटील पोहुन गेले!