हटके

गाण्यातला पाऊस धुंद वादळाची होती रात्र पावसाची

गाण्यातला पाऊस    धुंद वादळाची होती रात्र पावसाची
08 Jul 2026, 23:15

  • गाण्यातला पाऊस 
  •  धुंद वादळाची होती रात्र पावसाची


 मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत म्हटलं तर विरह व व्याकुळ करणारं आहे. पण त्यातहीगोड, मस्त रोमान्स आहे. तो रोमान्स पहिल्या ओळीतूनच सु्रू होतो. धुंद वादळ आणि रात्र पावसाची असताना झालेली ती भेट कायम आठवणीत राहील, अशीच. प्रेमात पडलेल्या, ब्रेकअप झालेल्या किंवा प्रेमात पडून पुढे विवाह झालेल्या अशा कोणत्याही प्रियकर व प्रेयसीला ती आठवण विसरता येणं शक्यच नाही.  मंगेश पाडगावकर यांचा पिंडही रोमँटिक असणार. त्यामुळेच ‘केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली, ओठावर माझ्या त्याची किती फुले झाली’, असं ते सहज लिहून जातात. यशवंत देव यांनीही हे गीत अतिशय प्रेमाने सजवलं-संगीतबद्ध केलं आहे.भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची 
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची धुंद वादळाची होती रात्र...
केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली ओठावर माझ्या त्याची किती फुले झाली श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या यशाची धुंद वादळाची होती रात्र...
सुगंधित हळव्या शपथ, सुगंधित श्वासस्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची..!
शेअर करा:
Facebook Twitter WhatsApp
कमेंट्स (0)

अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!