लिखित ज्ञान शाश्वत ठेवले. आम्हाला लहानपणी चीनी प्रवासी विद्यार्थ्याची एक लोककथा सांगितली गेली होती. तो अनेक वर्ष भारतात शिकला, इथले ज्ञान टिपून घेतले. बोटीने आपल्या गावी प्रवास
करू लागला; सोबत त्याचे भारतीय वर्गबंधू होते. एका ठिकाणाहून नदी पार करत असतांना पाणी अचानक वाढले आणि बोट बुडेल असे होऊ लागले. बोटीचे वजन कमी केले तर ती तरून जाईल असे नावीक म्हणाला. तो चीनी विद्यार्थी आपले ग्रंथ टाकावे लागतील या भावनेने खिन्न झाला. पण तोवर सोबतच्या भारतीय वर्गबंधूंनी पाण्यात उडी टाकून ते लिखित ज्ञान शाश्वत ठेवले. आयुष्याचे मोल देऊन ते ज्ञान शाश्वत ठेवले.
------आज हा फोटो पाहून ती लोककथा नसून खरी असावी असा विश्वास मला वाटतोय. आळंदीत एका धर्मशाळेत पाणी शिरले तर तेथील रहिवासी साधकाने इतर काही साहित्य सोबत न घेता ग्रंथ सोबत नेले. बाकीचे भौतिक साहित्य संपले, नष्ट झाले तरी हरकत नाही. हे ज्ञान टिकले पाहिजे, ही जी जाण आहे ती समाज, जात, आर्थिक परिस्थितीपेक्षा वर आहे.