नोकरी
वाचा आजचा करिअर कंसेप्ट- मार्ग यशाचा– मुक्त संधींचे खुले आकाश
08 Jul 2026, 23:04
वाचा आजचा करिअर कंसेप्ट- मार्ग यशाचा–मुक्त संधींचे खुले आकाशनव्या तंत्रज्ञानामुळे सध्याच्या रोजगाराचे स्वरूप बदलणार असले, तरी कल्पकता आणि तांत्रिक जाण असणाऱ्यांना प्रगतीच्या मुक्त संधींचे आकाश खुले होईल. यामुळे पुढील काळात 'उपयोजित ज्ञान' (ॲप्लाइड नॉलेज) मिळवणे हीच यशाची गुरुकिल्ली ठरेल.(६) बँकिंग आणि फिनटेक भविष्यातील बँकिंग हे 'डिजिटल सेवा केंद्र' असेल. यापुढे बँकांना व्यक्तिगत स्वरुपाच्या सेवा प्रभावीरित्या द्याव्या लागतील. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाच्या खर्चाच्या सवयीवरून त्याला गुंतवणुकीचा सल्ला देणारी 'एआय' यंत्रणा. यामुळे बँकिंगमध्ये तंत्रज्ञानासोबत संवाद समन्वय साधणाऱ्या 'प्रॉडक्ट मॅनेजर्स' ची मागणी प्रचंड वाढेल.भविष्यातील संधी: डिजिटल इकोसिस्टम आर्किटेक्ट: बँकेच्या विविध डिजिटल सेवा (ॲप वॅलेट, युपीआय) एकमेकांशी सुरक्षितपणे जोडणारे तज्ज्ञ, सायबर रिस्क आणि फ्रॉड ॲनॅलिस्ट: एआयच्या मदतीने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला रोखण्यासाठी 'डिजिटल सुरक्षा रक्षक' म्हणून काम करणारे तज्ज्ञ, नियो बँकिंग एक्स्पर्ट्स : भौतिक शाखा नसलेल्या, केवळ मोबाईलवर चालणाऱ्या बँकांमधील विविध तांत्रिक पदे, डेटा सायंटिस्ट: बँकेत जमा होणाऱ्या 'बिग डाटा'चे विश्लेषण करून नवीन योजना सुचवणारे तज्ज्ञ. आवश्यक तंत्रकौशल्ये: भविष्यवेधी विश्लेषण - ग्राहकांच्या भविष्यातील आर्थिक गरजा ओळखण्यासाठी 'प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग' चा वापर करणे,ब्लॉकचेन आणि एपीआय: सुरक्षित व्यवहार आणि इतर वित्तीय संस्थांशी देवाणघेवाण करण्याची तांत्रिक जाण, एआय मार्केटिंग व चॅटबॉट्स: ऑटोमेशन प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांशी प्रभावी संवाद साधण्याचे तंत्र, डिझाइन थिंकिंग: बँकिंग सेवा अधिक सोपी आणि ग्राहकस्नेही कशी बनवता येईल, याचा सर्जनशील विचार करण्याचे कौशल्य, नियामक साक्षरता- बँकिंग क्षेत्रातील नियमांची सखोल माहिती. (उदा. आरबीआयचे नियम, डाटा प्रायव्हसी कायदा), सहकार्य आणि समन्वयक वृत्ती: तांत्रिक टीम आणि प्रत्यक्ष बँकिंग करणाऱ्यांमध्ये समन्वय साधून काम करण्याची वृत्ती.(७) मॅन्युफॅक्चुरिंग- कारखान्यातील शॉप फ्लोअर (यंत्रे, कच्चा माल आणि कामगार एकत्र येऊन प्रत्यक्ष काम करण्याची जागा) वरील सर्व कामे करण्यासाठी टेस्ला कंपनीने, ‘ऑप्टिमस’ या ह्युमोनाइडची निर्मिती केली आहे. तो मानवासारखा चालतो, वस्तू हाताळतो. उत्पादन प्रक्रियेत थेट सामील होतो. यामुळे उत्पादनक्षमतेत वाढ होईल. खर्च कमी होईल. कामगारांचे पुनः-प्रशिक्षण कमी होईल. रोबोटिक्स, एआय आणि इंटरनेट ऑफ थिंग्जचा अधिकाधिक वापर निर्मिती/उत्पादन क्षेत्रात करण्याकडे उद्योजकांचा कल दिसून येतो. त्यामुळे या क्षेत्राचे झपाट्याने डिजिटल ट्रांसफॉर्मेशन (रुपांतरण) होताना दिसते. भविष्यवेधी देखभाल/ दुरुस्ती यंत्रणा, तक्षणी माहितीचे संनियंत्रण, स्वयंचलन यंत्रणा यावर अधिकाधिक गुंतवणूक केली जाईल. वेळ आणि संसांधनाची किमान हानी व्हावी किंवा अजिबातच होऊ नये यासाठी दोषविरहित उत्पादनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाईल.करिअर संधी- इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि स्मार्ट अभियांत्रिकीचे ज्ञान असणारे अभियंते आणि तंत्रज्ञ, पुरवठा साखळी माहिती विश्लेषक (सप्लायचेन डाटा ॲनॅलिस्ट), डिमांड प्लॅनर्स, भविष्यवेधी विश्लेषक तज्ज्ञ, पुरवठा साखळी रणनीतिकार, एआय/मशिन लर्निंग प्रारुपाचे विकासक, रिन्युएबल एनर्जी सिस्टिम इंजिनिअर्स, सस्टेनिबिलिटी/ एन्व्हीरॉन्मेंटल इंजिनीअर्स, वेस्ट मॅनेजमेंट ॲण्ड रिसायकलिंग स्पेशॅलिस्ट, एनर्जी इफिशिएंसी ॲनॅलिस्टआवश्यक कौशल्ये- एआय, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इंडस्ट्रिअल कंट्रोल सिस्टिम, क्लॉऊड कॉम्प्युटिंग, एससीएडीए (सुपरव्हायजरी कंट्रोल आणि डाटा ॲक्विझिशन), डाटा ॲनॅलिटिक्स ॲण्ड व्हिज्युलायझेशन, सर्व प्रकारच्या तांत्रिक प्रारुपांना प्रशिक्षण देऊ कार्यान्वित करण्याची क्षमता.(८) औषधीनिर्माण- या क्षेत्रात प्रगत असे संगणकीय तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. त्यामुळे केवळ ९ महिन्यात कोविडवरील लसीची निर्मिती शक्य झाली. एआय आणि मशिन लर्निंग तंत्रामुळे औषध निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यांवर, माहिती (डाटा) वर आधारित निर्णय घेणे सुलभ झाले आहे. भारत, हा औषध निर्माण क्षेत्रातील सर्वात मोठा देश असल्याने, संशोधन, उत्पादन, निर्यात या क्षेत्रातील विविध जागतिक कंपन्या भारताकडे आकर्षित झाल्या आहेत. त्यामुळे उच्च तांत्रिक कौशल्य मिळवलेल्या उमेदवारांसाठी करिअरच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.करिअर संधी- एआय आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाने युक्त डाटा सायंटिस्ट, ॲनॅलिटिक्स एर्क्स्पट, विशेष तांत्रिक बाबींचे ज्ञान असणारे तज्ज्ञ, डिजिटल आरोग्य आणि व्यक्तिगत स्वरुपाच्या औषधांसाठी आवश्यक नियामके आणि नियमांची माहिती असलेले माहितगार.आवश्यक कौशल्ये- बायोइन्फॉर्मेटिक्स, जेनोमिक्स, फार्मासिक्युटिकल सायंस, डिजिटल लिटरसी, डिजिटल मार्केटिंग, क्लॉऊड कॉम्प्युटिंग, स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग, मशिन लर्निंग, डाटा व्हिजुलाझेशन(९) एरोस्पेस इंजिनीअरिंग – हे क्षेत्र केवळ विमाने किंवा उपग्रह बनवण्यापुरते मर्यादित न राहता, आता 'प्रगत वाहतूक आणि संरक्षण' क्षेत्राचा कणा बनलेय. भारत आणि जागतिक स्तरावर खाजगी कंपन्यांच्या वाढत्या सहभागामुळे (उदा. स्पेस एक्स, अग्निकुल) या क्षेत्रात संशोधनाच्या प्रचंड संधी निर्माण होताहेत. एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने अधिक सुरक्षित आणि इंधनक्षम अशा 'नेक्स्ट-जनरेशन' हवाई वाहनांची निर्मिती केली जाते. यामध्ये हायब्रीड इंजिन्स, ड्रोन तंत्रज्ञान आणि उपग्रह संप्रेषण प्रणालीचा प्रमाणावर समावेश आहे.करिअर संधी: सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डाटा ॲनॅलिटिक्स, व्हेइकल डिझाइन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टिम तज्ज्ञ, बॅटरी टेक्नॉलॉजी आणि व्हेइकल कनेक्टिव्हिटी तज्ज्ञ, सायबर सेक्युरिटी तज्ज्ञ.आवश्यक कौशल्ये: एआय आणि मशीन लर्निंगमधील तज्ज्ञता, डेटा ॲनॅलिटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, 'फ्लुइड डायनॅमिक्स' आणि 'मटेरिअल सायन्स'ची सखोल जाण.'हायब्रिड' आणि 'सॉफ्ट स्किल्स'भविष्यातील करिअरमध्ये केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे ठरणार नाही. 'एआय' ज्या गोष्टी करू शकत नाही, अशा ' ह्युमन सेंट्रिक' (मानव-केंद्रित) कौशल्यांना अधिक मागणी असेल. यालाच 'हायब्रिड स्किल्स' असे म्हटले जाते. यात पुढील काही कौशल्यांचा समावेश आहे.(१) क्रिटिकल थिंकिंग आणि एथिक्स (तर्कशुध्द विचारकौशल्य व नीतिमत्ता): केवळ एआयने दिलेली माहिती स्वीकारणे पुरेसे नाही. माहितीची अचुकता, पूर्वग्रह आणि वापरातील नैतिकता याची पडताळणी करण्यासाठी चिकित्सक विचारशक्तीची गरज भासेल. (२) इमोशनल इंटेलिजन्स (भावनिक बुद्ध्यांक): यंत्रे संवाद साधू शकतात, पण भावना समजू शकत नाहीत. बँकिंग, हेल्थकेअर किंवा व्यवस्थापन क्षेत्रात ग्राहकांच्या भावना समजून घेऊन, त्यांच्याशी संवेदनशीलतेने संवाद साधणे हे महत्वाचे मानवी कौशल्य राहील. यामध्ये सहानुभूती आणि ' सहाकाऱ्यांसोबतची एकजिनसता' महत्त्वाची ठरेल. (३) ॲडॅप्टॅबिलिटी (अनुकूलनक्षमता) आणि सतत शिकण्याची क्षमता: आज शिकलेले तंत्रज्ञान दोन वर्षांत कालबाह्य होऊ शकते. त्यामुळे सतत नवीन ज्ञान आणि कौशल्य ग्रहण करण्याची वृत्ती अंगी बाणवने हेच भविष्यातील सर्वात मोठे कौशल्य असेल. नवी कार्यसंस्कृती १) 'गीग इकॉनॉमी' आणि फ्रीलान्सिंग:'एक व्यक्ती, एक नोकरी' हे समीकरण बदलण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पुढील काळात 'गीग इकॉनॉमी'चे प्राबल्य वाढेल. एखादा 'डेटा ॲनॅलिस्ट' किंवा 'एआय कन्सल्टंट' एकाच वेळी जगभरातील विविध कंपन्यांसाठी प्रकल्प आधारित काम करू शकेल. यामुळे कामात लवचिकता येईल, पण स्वतःचे ब्रँडिंग आणि वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल.२)'एज्युटेक' (शैक्षणिक तंत्रज्ञान):शिक्षणाचे स्वरूप आता केवळ वर्गापुरते मर्यादित राहिलेले नाही. पर्सनलाईज्ड लर्निंग (प्रत्येकाच्या आकलनक्षमते शिक्षण) आणि व्हर्च्युअल क्लासरूम्स (आभासी वर्ग)मुळे शिक्षणाची व्याप्ती वाढली आहे.नव्या संधी: इन्स्ट्रक्शनल डिझायनर्स (शैक्षणिक रचना तज्ज्ञ), ई-लर्निंग डेव्हलपर्स आणि 'लर्निंग एक्सपिरियन्स डिझायनर्स'.३) शाश्वत विकास आणि 'ग्रीन करिअर्स'पर्यावरण रक्षण आता केवळ सामाजिक कार्य राहिले नसून तो एक मोठा उद्योग बनला आहे. कार्बन अकाउंटिग (एखादी संस्था, उद्योग, शहर किंवा देश आपल्या कामांमधून वातावरणात किती प्रमाणात हरितगृह वायू (ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जित करतो, याची मोजणी करण्याची प्रक्रिया): प्रत्येक उद्योगाला आपले कार्बन उत्सर्जन मर्यादित ठेवावे लागेल. यासाठी 'कार्बन ऑडिटर्स' आणि 'सस्टेनेबिलिटी मॅनेजर्स' मोठ्या संख्येने लागू शकतात.सर्क्युलर इकॉनॉमी (अशी आर्थिक व्यवस्था जिथे नैसर्गिक संसाधनांचा वापर किमान केला जातो. उत्पादित वस्तू फेकून न देता त्या शक्य तितक्या काळ उपयोगात आणल्या जातात किंवा त्यांचे पुनर्चक्रीकरण केले जाते.): हीव्यवस्था उभी करण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासेल. यात कचरा व्यवस्थापन, शाश्वत उत्पादन डिझाइन आणि हरित पुरवठा साखळी यांचा समावेश होतो. सुरेश वांदिले
कमेंट्स (0)
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!