महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील डी.एड., बी.एड. आणि टीएआयटी (TAIT) पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पवित्र (Pavitra) पोर्टलद्वारे राज्यातील ३०,२०९ रिक्त शिक्षक पदांच्या मेगाभरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र उमेदवारांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आपल्या पसंतीक्रमाची (Preference) नोंद करून तो 'लॉक' करणे अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीत पसंतीक्रम लॉक न केल्यास संबंधित उमेदवार पुढील भरती प्रक्रियेस अपात्र ठरू शकतो.
भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी रिक्त पदांचे दोन गट करण्यात आले आहेत.
● मुलाखतीशिवाय थेट भरती – १९,८८१ पदे
जिल्हा परिषद, महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांचा TAIT गुण आणि पसंतीक्रम यांच्या आधारे संगणकीय पद्धतीने गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
● मुलाखतीसह भरती – १०,३२८ पदे
अनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांतील रिक्त पदांसाठी गुणवत्तेनुसार एका जागेसाठी तीन उमेदवार (१:३) मुलाखत व अध्यापन कौशल्य (Demo Class) चाचणीसाठी पाठविले जातील.
शालेय शिक्षण विभागाने नव्या आदेशानुसार खासगी शाळा व्यवस्थापनांना पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत दोन महिन्यांवरून तीन महिने (९० दिवस) करण्यात आली आहे. त्यामुळे कागदपत्र पडताळणी, मुलाखती आणि नियुक्ती प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे पूर्ण करता येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह पुढील कागदपत्रे सादर करावीत.
निवड झालेल्या उमेदवारांची प्रारंभी 'शिक्षण सेवक' म्हणून नियुक्ती होईल. शासनाच्या नियमानुसार तीन वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियमित वेतनश्रेणी, भत्ते आणि इतर सेवा लाभ लागू होतील.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!