गेमिंग इंडस्ट्री : करिअरच्या नव्या वाटा

नोकरी

गेमिंग इंडस्ट्री : करिअरच्या नव्या वाटा

भारतातील डिजिटल गेमिंग उद्योग वेगाने विस्तारत असून गेम डिझाइन, गेम डेव्हलपमेंट, ॲनिमेशन आणि ई-स्पोर्ट्स क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

Krantiwave 06 Aug 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X

– सुरेश वांदिले, करियर मार्गदर्शक, मुंबई

भारतातील गेमिंग क्षेत्र आता केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाही. या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी निर्माण झाल्या आहेत. तरुण डेव्हलपर्स सातत्याने नवनवीन प्रयोग करत असून जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावत आहेत. 'युनिटी' (Unity) आणि 'अनरिअल इंजिन' (Unreal Engine) यांसारख्या अत्याधुनिक सॉफ्टवेअर्सच्या मदतीने ते उच्च दर्जाचे ग्राफिक्स आणि आकर्षक गेम्स विकसित करत आहेत. या नव्या पिढीतील डेव्हलपर्सचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पौराणिक कथा, लोककथा आणि स्थानिक संस्कृतीतील पात्रांचा सर्जनशील वापर. त्यामुळे भारतीय विषयांवर आधारित गेम्सना जागतिक बाजारपेठेतही मोठी पसंती मिळत आहे.

गेमिंग उद्योगाची झपाट्याने होत असलेली वाढ

या डेव्हलपर्सनी पारंपरिक मनोरंजनाच्या चौकटी मोडून गेमिंगला एक व्यावसायिक आणि उच्च मूल्य असलेला उद्योग बनविला आहे. काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्सने आयोजित केलेल्या 'Xbox Game Camp Asia' या उपक्रमात भारत, सिंगापूर आणि मलेशिया येथील तरुणांनी सादर केलेल्या गेम्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतामध्ये गेमिंग स्टार्टअप्सची संख्या वेगाने वाढत आहे. बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद ही शहरे गेम डेव्हलपमेंटची प्रमुख केंद्रे बनली आहेत. गेल्या काही वर्षांत भारताने 'गेम खेळणारा देश' ते 'गेम तयार करणारा देश' असा उल्लेखनीय प्रवास केला आहे. डिजिटल क्रांती, स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे हे क्षेत्र आज उच्च वेतन देणाऱ्या करिअर क्षेत्रांपैकी एक बनले आहे.

भारतातील गेमिंग उद्योगाचे चित्र

आज भारतात ९०० हून अधिक गेमिंग कंपन्या कार्यरत आहेत. ई-स्पोर्ट्स आणि फॅन्टसी गेम्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या उद्योगाची बाजारपेठ अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. जागतिक गेमिंग कंपन्याही भारतात आपली डेव्हलपमेंट सेंटर्स उभारत आहेत. त्यामुळे २०२६ आणि त्यानंतरच्या काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कोण करू शकतो या क्षेत्रात करिअर?

चित्रकला, कथाकथन (Storytelling), कोडिंग, गणित किंवा तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र अत्यंत उपयुक्त आहे.

  1. यशासाठी आवश्यक गुण :
  2. सर्जनशील विचारशक्ती
  3. कल्पकता
  4. तांत्रिक कौशल्य
  5. समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता
  6. सांघिक कार्य करण्याची वृत्ती
  7. नवनवीन व्हर्च्युअल जग निर्माण करण्याची आवड
  8. मूलभूत गणित आणि तार्किक विचारशक्ती चांगली असल्यास कोडिंग शिकणे सोपे जाते. मात्र गेम डिझाइन, गेम आर्ट आणि व्हिज्युअल डिझाइनमध्ये कोणत्याही शाखेतील विद्यार्थी करिअर करू शकतात.
  9. आवश्यक तांत्रिक कौशल्ये
  10. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पुढील कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे—
  11. C++ आणि Java यांसारख्या प्रोग्रॅमिंग भाषा
  12. Unity 3D आणि Unreal Engine चे ज्ञान
  13. गेम पात्रांची (Character Design) निर्मिती
  14. स्टोरीटेलिंग आणि स्क्रिप्ट लेखन
  15. Visual Effects (VFX)
  16. तार्किक विचारशक्ती
  17. टीमवर्क

अभ्यासक्रम आणि शिक्षण संस्था

१. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID) – Bachelor of Design (Animation Film Design)

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना चित्रकलेद्वारे कथा सांगण्याची कला, ॲनिमेशन, भारतीय कथाकथन परंपरा, संगीत, ध्वनी आणि डिजिटल अॅनिमेशनचे अत्याधुनिक तंत्र शिकवतो. विद्यार्थी मूळ ॲनिमेशन कलाकृती, ग्राफिक कादंबऱ्या आणि डिजिटल माध्यमातील सर्जनशील प्रकल्प तयार करू शकतात.

रोजगाराच्या संधी :
चित्रपट उद्योग
दूरचित्रवाहिन्या
गेमिंग स्टुडिओ
ॲनिमेशन स्टुडिओ
UI/UX डिझाइन
ई-लर्निंग कंपन्या
स्वतःचा स्टुडिओ

कालावधी : ४ वर्षे

पात्रता : कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण, गुणांची कोणतीही अट नाही, डिप्लोमा व एचएससी व्होकेशनल विद्यार्थीही पात्र

२. Master of Design – Toy and Game Design (NID)

हा अभ्यासक्रम 'खेळ' (Play) या संकल्पनेवर आधारित आहे. शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण खेळ व खेळणी विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

अभ्यासातील प्रमुख विषय :

डिजिटल व बोर्ड गेम्स, खेळणी आणि प्ले स्पेसेस, शैक्षणिक खेळ, Interactive Experiences, Sports Equipment Design. हा अभ्यासक्रम गांधीनगर कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.

३. Master of Design – Digital Game Design (NID)

हा अभ्यासक्रम संगणकशास्त्र, ललित कला आणि सामाजिक विज्ञान यांचा संगम घडवतो.

विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे विषय :

Digital Arts

Game Theory

2D व 3D Graphics

Storytelling

Multiplayer Games

Educational Games

Game Monetization

User Interface Design

Sound Design

Digital Rendering

गेम डिझाइन उद्योगाची रचना, स्टुडिओ व्यवस्थापन आणि स्वतंत्र डेव्हलपर्सचे योगदान यांचाही अभ्यास या अभ्यासक्रमात केला जातो.

पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, गुणांची कोणतीही अट नाही

४. MIT Institute of Design, पुणे

या संस्थेत Bachelor of Design in Game Design हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

मुख्य विषय :

Game Art

Game Design

Game Production

Programming

Concept Design

Environmental Design

2D आणि 3D Art

Strategy

Game Psychology

Level Design

संकेतस्थळ : www.mitid.edu.in

५. ICAT Design & Media College (चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद)

१९९५ पासून गेमिंग आणि डिझाइन क्षेत्रात प्रशिक्षण देणारी ही अग्रगण्य संस्था आहे.

पदवी अभ्यासक्रम (४ वर्षे)

Game Art & Design

Game Design & Development

Game Programming

पदव्युत्तर अभ्यासक्रम (२ वर्षे)

Game Technology

प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम (१ वर्ष)

Game Technology

Game Programming

Game Design

संकेतस्थळ : www.icat.ac.in

करिअरच्या संधी

  • गेमिंग क्षेत्रात पुढील पदांवर करिअर करता येते—
  • Game Designer
  • Game Developer
  • Game Programmer
  • Character Artist
  • 3D Artist
  • Animator
  • UI/UX Designer
  • Level Designer
  • VFX Artist
  • Story Writer
  • Sound Designer
  • Technical Artist
  • QA Game Tester
  • Esports Manager
  • Indie Game Developer