घेवडा : कमी काळात अधिक  नफा देणारे फायदेशीर पीक

शेती

घेवडा : कमी काळात अधिक नफा देणारे फायदेशीर पीक

उत्तर भारतात घेवड्याला ‘राजमा’ म्हणून ओळखले जाते. शेंगवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये घेवडा हे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक आदी जिल्ह्यांत श्रावण घेवड्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. राज्यात अंदाजे 31,050 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ लोकप्रिय आहे. पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठीही केला जातो. शेंगांमध्ये अ आणि ब जीवनसत्त्वे, लोह, चुना, खनिजे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.

Krantiwave 17 Jul 2026 5 मिनिटे वाचन
Facebook WhatsApp X
  • -दिलीप पार्लेकर,  शेती अधिकारी, क्रांती साखर कारखाना, कुंडल
जमीन व हवामानघेवडा हलक्या ते मध्यम, चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत उत्तम येतो. अतिभारी जमिनीत झाडांची वाढ जास्त होते; मात्र शेंगा कमी लागतात. जमिनीचा सामू (pH) 5.5 ते 6 दरम्यान असावा. हे पीक थंड हवामानात तसेच पावसाळ्यात चांगले वाढते. 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी अनुकूल आहे. अतिथंडी किंवा अतिउष्ण हवामान घेवड्यास मानवत नाही.पूर्व मशागतजमिनीची उभी-आडवी नांगरट करून, कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत व जमीन भुसभुशीत करावी. प्रतिहेक्टर 40 ते 45 बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे.लागवडीचा हंगाममहाराष्ट्रात लागवड तीनही हंगामात करता येते. खरीप : जून–जुलै, रब्बी : सप्टेंबर–ऑक्टोबर, उन्हाळी : जानेवारी–फेब्रुवारी.सुधारित वाणकटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्ही. एल.-5, जंपा, पंत अनुपमा, फुले सुयश या जाती लागवडीस योग्य आहेत.बियाण्याचे प्रमाणप्रतिहेक्टर 40 किलो बियाणे लागते. टोकण पद्धतीने लागवड केल्यास 25 ते 30 किलो बियाणे पुरेसे ठरतेलागवड पद्धतखरीप हंगामात पहिला पाऊस झाल्यानंतर जमीन वाफशावर आल्यावर पेरणी करावी. पाभरीने किंवा तिफणीने पेरणी करता येते. दोन ओळीतील अंतर : 45 सेंमी. दोन झाडांतील अंतर : 30 सेंमी. बिया 2 ते 3 सेंमी. बिया  खोलीवर टोकाव्यात. उन्हाळी हंगामात 60 ते 70 सेंमी अंतरावर सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी.खत व्यवस्थापनघेवडा पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश शोषून घेते. त्यामुळे संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक आहे.शिफारसशेणखत : 40 टन/हेक्टर, नत्र : 50 ते 54 किलो/हेक्टर, स्फुरद : 50 ते 100 किलो/हेक्टर, पालाश : 50 ते 110 किलो/हेक्टर. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र पेरणीवेळी द्यावे. उरलेले अर्धे नत्र उगवणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावे.पाणी व्यवस्थापनघेवड्याची मुळे उथळ असल्याने जास्त पाणी अपायकारक ठरते. फुलोऱ्याच्या काळात पुरेसा ओलावा आवश्यक असतो. खरीप हंगामात साधारणतः अतिरिक्त पाणी लागत नाही. पाऊस कमी असल्यास गरजेनुसार पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात निचरा चांगला ठेवणे अत्यावश्यक.आंतरमशागतपेरणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. तणनियंत्रणासाठी 1 ते 2 खुरपण्या द्याव्यात किंवा पेरणीपूर्व तणनाशक वापरावे. पाण्याचा निचरा न झाल्यास चर काढून पाणी बाहेर सोडावे.