सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेची अशी करा तयारी
आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात IBPS बँकिंग परीक्षा ही केवळ नोकरीची संधी नसून हजारो तरुणांच्या करिअर स्वप्नांची दिशा ठरवणारी महत्त्वपूर्ण पायरी आहे. मात्र या परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते; योग्य नियोजन, अभ्यासाची अचूक दिशा, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सराव यांची सांगड तितकीच आवश्यक असते. स्पर्धेच्या या कठीण प्रवासात नव्या उमेदवारांनी नेमकी कोणती रणनीती अवलंबावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि यशाकडे वाटचाल कशी करावी, याचे अत्यंत सोप्या, नेमक्या आणि मार्गदर्शक. IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या बँकिंग परीक्षांमध्ये स्पर्धा खूप मोठी आहे आणि निवड होण्यासाठी फक्त अभ्यास करून चालत नाही, तर योग्य दिशा, नियोजन आणि सातत्य आवश्यक असते. अनेक विद्यार्थी सुरुवातीला उत्साहाने तयारी सुरू करतात, पण काही दिवसांनी गोंधळ, वेळेचे योग्य नियोजन न होणे आणि चुकीच्या पद्धतीमुळे त्यांचा अभ्यास विस्कळीत होतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच व्यवस्थित आणि विचारपूर्वक तयारी करणे गरजेचे आहे.
IBPS Pre परीक्षा ही तीन मुख्य विषयांवर आधारित असते – Reasoning Ability, Quantitative Aptitude आणि English Language. या तिन्ही विषयांना समान महत्त्व अाहे. प्रत्येक सेक्शनसाठी मर्यादित वेळ दिलेला असल्यामुळे वेळेचे व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. ही परीक्षा अंतिम मेरिटमध्ये मोजली जात नसली तरी पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी ती उत्तीर्ण करणे अत्यावश्यक आहे.तयारीची सुरुवात करताना सर्वात आधी प्रत्येक विषयातील मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी थेट अवघड प्रश्न सोडवायला सुरुवात करतात, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि अभ्यासात सातत्य राहत नाही. त्यामुळे सुरुवातीला सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करून हळूहळू अवघड स्तराकडे जाणे ही योग्य पद्धत आहे. Reasoning Ability हा विषय विचारशक्ती आणि तर्कशक्तीवर आधारित अाहे. Puzzle आणि Seating Arrangement हे प्रश्न पेपरचा स्तर ठरवतात. या विभागात चांगले गुण मिळवण्यासाठी दररोज सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Syllogism, Coding-Decoding, Inequality, Blood Relation, Direction यांसारख्या टॉपिक्सवर नियमित काम केल्यास हा विषय स्कोअरिंग ठरतो. मात्र प्रश्न सोडवण्याची पद्धत विकसित करणे गरजेचे आहे, कारण फक्त उत्तर मिळवणे पुरेसे नसते.Quantitative Aptitude हा वेग आणि अचूकतेची खरी परीक्षा असतो. या विषयात Calculation speed जितकी जास्त, तितका फायदा होतो. Simplification आणि Number Series हे टॉपिक्स रोज सरावासाठी ठेवणे आवश्यक आहे, तर Arithmetic (Time & Work, Profit & Loss, Ratio, SI/CI) या घटकांवर मजबूत पकड असणे गरजेचे आहे. Data Interpretation हा भाग वेळखाऊ असतो, त्यामुळे त्यासाठी स्वतंत्र सराव करणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी या विषयाला घाबरतात, पण योग्य सराव आणि सातत्य ठेवल्यास हा विषय सर्वाधिक गुण देणारा ठरू शकतो.English Language हा अनेकदा दुर्लक्षित केला जातो, पण cutoff clear करण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असतो. Reading Comprehension, Cloze Test, Error Detection आणि Para Jumbles यांचा नियमित सराव आवश्यक आहे. Grammar चे नियम समजून घेतल्याशिवाय इंग्रजीमध्ये प्रगती होत नाही. Vocabulary वाढवण्यासाठी दररोज वाचनाची सवय लावणे फायदेशीर ठरते. हा विषय हळूहळू सुधारतो, त्यामुळे सातत्य खूप महत्त्वाचे आहे.अभ्यास करताना वेळेचे योग्य नियोजन असणे ही यशाची किल्ली आहे. दिवसाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यास केल्यास सर्व विषयांवर समान लक्ष देता येते. उदाहरणार्थ, सकाळी Quant, दुपारी Reasoning, संध्याकाळी English आणि रात्री revision अशी सवय लावल्यास अभ्यास अधिक प्रभावी होतो. दररोज 5 ते 6 तासांचा दर्जेदार अभ्यास आवश्यक आहे, मात्र फक्त तास मोजण्यापेक्षा अभ्यासाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. Mock Tests हा तयारीतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अनेक विद्यार्थी शेवटच्या टप्प्यात mock tests देण्यास सुरुवात करतात, पण सुरुवातीपासूनच त्याचा समावेश केल्यास स्वतःची पातळी समजते. आठवड्याला किमान 2 ते 3 mock tests देणे आणि प्रत्येक टेस्टनंतर सखोल analysis करणे आवश्यक आहे. आपण कुठे चुकतोय, कोणत्या सेक्शनमध्ये वेळ जास्त जातोय, कोणते प्रश्न टाळायला हवेत हे mock tests मधून स्पष्ट होते.तयारीदरम्यान काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, अवघड प्रश्नांमध्ये अडकून वेळ वाया घालवणे आणि negative marking कडे दुर्लक्ष करणे या चुका टाळल्या पाहिजेत. योग्य पद्धत म्हणजे सोपे प्रश्न आधी सोडवणे, अवघड प्रश्न सोडून पुढे जाणे आणि accuracy टिकवणे. कमी प्रश्न सोडवले तरी अचूकता जास्त असेल तर गुण वाढतात. तयारी करताना मानसिक स्थैर्य आणि सातत्य राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही दिवस प्रगती दिसत नाही, काही वेळा motivation कमी होतो, पण अशा वेळी अभ्यास थांबवणे ही मोठी चूक असते. दररोज थोडा का होईना अभ्यास सुरू ठेवणे आवश्यक आहे. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरते.दत्तात्रय कोळी, करिअर मार्गदर्शक, इचलकरंजी
We use cookies to improve your experience, analyze site traffic, and show relevant content.
Read our privacy policy.