नोकरी
सांगली जिल्हा मध्यवर्ती नोकर भरतीतील IBPS जिंकायची असेल तर ‘लॉजिक’ शिका!
“मी IBPS ची परीक्षा पास होऊ शकतो का?” हा प्रश्न दिसायला साधा आहे, पण खरं सांगायचं तर याचे उत्तर अवघड आहे. कारण या एका प्रश्नाचे उत्तर पुढील गोष्टीवर अवलंबून आहे, तुमची गणित, English या विषयांचे ज्ञान, तुमची मानसिकता, तुमचं धैर्य आणि तुमची तयारी करण्याची क्षमता.
Krantiwave
17 Jul 2026
5 मिनिटे वाचन
6 views
IBPS साठी पात्रता काय? तर कोणतीही पदवी. म्हणजे कुणीही फॉर्म भरू शकतो. पण सगळे पास होतात का? नाही. कारण ही परीक्षा फक्त “तुम्ही किती अभ्यास केला” हे बघत नाही, तर “तुम्ही किती वेगाने आणि अचूक विचार करू शकता” हे तपासते. इथे पाठांतर चालत नाही, इथे आकलन क्षमता व स्ट्रॉंग लॉजिक लागत. अनेकांना वाटतं, बँकेची परीक्षा म्हणजे अकाउंटिंग येणार आणि B.Com वाले सहज पास होतील. हा गैरसमज आहे. प्रिलिम्समध्ये एकही प्रश्न बँकिंग किंवा अकाउंटिंगचा नसतो, आणि मुख्य परीक्षेतही फारसा संबंध नसतो. इथे विषय असतात - Quantitative Aptitude, Reasoning Ability आणि English. आणि इथेच इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सुरुवातीपासून पुढे दिसतात. कारण त्यांचा पाया आधीच मजबूत असतो. ११वीपासून Maths, तेही इंग्रजीतून त्यामुळे प्रश्न समजायला वेळ लागत नाही. Reasoning त्यांच्यासाठी नवीन नसतं; लॉजिक लावणं, पॅटर्न ओळखणं हे त्यांचं रोजचं काम असतं.इंजिनिअरिंगमध्ये जाडजूड पुस्तक असतं, पण वेळ कमी असतो, त्यामुळे ते योग्य मुद्यावर अभ्यास करतात. हीच सवय त्यांना IBPS मध्ये फ्रंटला ठेवते. त्यातच कमी वेळेत जास्त अभ्यास करण्याची कला, प्रेशरमध्ये शांत राहण्याची क्षमता आणि रात्रभर जागून काम पूर्ण करण्याची सवय हे सगळं चार वर्षांत ते शिकलेले अनुभवलेलं असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते या परीक्षेकडे “परीक्षा” म्हणून बघत नाहीत, तर “प्रोजेक्ट” म्हणून घेतात. आता B.Com, B.Sc आणि BA विद्यार्थ्यांची विषयी . B.Com विद्यार्थ्यांना वाटतं, “आपल्याला बँकिंग येतं, आपल्याला फायदा होईल,” पण प्रत्यक्षात परीक्षेत त्याचा उपयोग होतं नाही. B.Sc विद्यार्थ्यांना इंग्रजीचा थोडा आधार मिळतो, पण बाकी सगळं नव्याने शिकावं लागतं. आणि BA विद्यार्थ्यांची स्थिती तर अजून वेगळी. मी स्वतः BA चा विद्यार्थी. आमची सवय म्हणजे एका ओळीच्या प्रश्नाचं उत्तर ४-५ पानं लिहायचं. पण इथे? ३० सेकंदात उत्तर काढायचं असतं. ११ वी पासून गणित दूर गेलेलं, Reasoning म्हणजे काय हेही माहित नसलेलं, इंग्रजी थोडंफार येतं पण आत्मविश्वास कमी.पण हे सगळं असूनही मी IBPS ची ऑफिसर लेव्हल परीक्षा पास केली आणि आज LIC मध्ये Class 2 Officer म्हणून काम करतो. दत्तात्रय कोळी, करिअर मार्गदर्शक, इचलकरंजी