फळबागांमध्ये व उसात घ्या आंतरपिके

शेती

फळबागांमध्ये व उसात घ्या आंतरपिके

काही फळबागा २ ते ३ वर्षे टिकणाऱ्या असतात. यामध्ये केळी, पपई, अननस यांचा समावेश होतो. यांचे लागवड अंतर जादा असते. यामध्ये पहिल्या वर्षी काही हंगामी भाजीपाला पिकांचे आंतरपीक फायदेशीर ठरते. संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू, अंजीर या फळबागा दहा वर्षांपेक्षा अधिक टिकतात. त्यांचे उत्पादन २५-३० वर्षांपर्यंत मिळत राहते. अशा बागांतून आंतरपिके घेण्यामुळे अधिक फायदा होतो.

Krantiwave 17 Jul 2026 5 मिनिटे वाचन 592 views
Facebook WhatsApp X

आंतरपिके घेण्याचे फायदे मुख्य फळबागेचे उत्पादन सुरू होईपर्यंतच्या काळात आंतरपिकांपासून आर्थिक कमाई करता येते. आपल्याकडील उपलब्ध साधन सामग्रीचा आणि मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करता येतो. उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा पुरेपूर मोबदला घेता येतो. आंतरपिकाच्या लागवडीमुळे जमिनीत सुधारणा घडवून आणता येते. आंतरपिकाचा लाभ मुख्य पिकांसाठीही करून घेता येतो. पिके निवडताना घ्यावयाची काळजी१. आंतरपीक हंगामी आणि कमी कालावधीत तयार होणारे असावे. २. त्याची वाढ आणि विस्तार मुख्य फळपिकांना झाकून टाकणारा अगर अडथळा आणणारा नसावा. ३. आंतरपिकांमुळे मुख्य पिकावर कीड-रोग यांचा प्रादुर्भाव होणारा नाही अशी त्याची निवड असावी. ४. फळबागेची जमीन सुधारेल असे आंतरपीक असावे. डाळिंबात  लावा पपईडाळिंबाची लागवड १५ x१० फुटांवर असल्यास त्यामध्ये १५ x ६ फूट अंतरावर  पपईची लागवड करता येते. म्हणजेच डाळिंबाच्या दोन ओळींमध्ये पपईची एक ओळ लावता येते. पपई लागवडीनंतर साधारणतः ९ महिन्यांनंतर उत्पादन मिळण्यास सुरवात होते. तैवान ७८६ सारखी पपईची जात असल्यास प्रत्येक झाडाला सरासरी ४० ते ४५ फळे लागतात. म्हणजेच प्रति झाडापासून ५० ते ६० किलो वजनाची फळे मिळू शकतात. एकरी १५ ते १६ टन पपई उत्पादन मिळते. कोबी, फ्लॉवरचे  आंतरपीक   ठरते फायदेशीरसात फुटाच्या उसात तसेच पपई, डाळिंबामध्ये कोबी,  फ्लॉवर यांचेदेखील आंतरपीक फायदेशीर ठरू शकते. पावसाळी, रब्बी हंगामामध्ये डाळिंब लागवडीनंतर पहिल्या वर्षी ही आंतरपिके घेऊन एकरी उत्पन्न मिळवता येते. तसेच चवळी किंवा श्रावणी घेवडा या द्विदलवर्गीय भाजीपाला पिकांचे उत्पादन जमिनीची सुपिकता वाढवण्यास मदत करते. केळीमध्ये फुलकोबी८ x५ फूट अंतरावर लागवड केलेल्या केळीच्या दोन ओळींमध्ये फुलकोबीचे (फ्लॉवर) आंतरपीक घेता येते. फ्लॉवरचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. त्यातील उत्पन्नातून केळी पिकातील खर्च कमी होऊ शकतो. काकडीमध्ये मिरचीफेब्रुवारी महिन्यात चार फुटांचे बेड तयार करून त्यावर दीड फूट अंतरावर काकडीच्या बियांची टोकण करावी. त्यानंतर तीन आठवड्यांनी मिरचीची रोपे दीड फुटांवर लावावीत. काकडीचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. एका पिकातील उत्पन्नातून दुसऱ्या पिकातील खर्च कमी होऊ शकतो. केळी पिकात खरबूज केळीच्या दोन ओळींमध्ये खरबुजाची लागवड करता येते. खरबुजाचे एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळू शकते. खरबुजातील उत्पन्नातून केळीतील खर्च कमी होतो. तोंडलीत घ्या मिरचीतोंडली बाग लावल्यानंतर पहिल्या दोन वर्षांपर्यंत त्यामध्ये उन्हाळ्यात ढोबळी मिरची किंवा साध्या (तिखट) मिरचीचे यशस्वी उत्पादन अनेक शेतकरी घेत आहेत. उन्हाळ्यामध्ये कडक सूर्यप्रकाश व जास्त तापमान असते. मात्र तोंडलीचा वेल मंडपावर चढवला असल्याने मंडपाखाली अर्धसावली मिळते. त्यामध्ये मिरचीचे पीक चांगल्या प्रकारे येते. फूलगळीची समस्या कमी होते.दिलीप पार्लेकर, शेती अधिकारी,  क्रांती साखर कारखाना, कुंडल